‘या’ रक्तगटाचे लोक असतात अधिक स्मार्ट? | पुढारी

‘या’ रक्तगटाचे लोक असतात अधिक स्मार्ट?

न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात रक्तगटावर एक संशोधन करण्यात आले. त्यामध्ये असे आढळून आले की सर्व रक्तगटांपैकी ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगट असलेल्या लोकांचा मेंदू सर्वात तीक्ष्ण असतो. या रक्तगटाच्या लोकांची विचारशक्ती अन्य लोकांपेक्षा चांगली असते.

ज्यांचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ आहे अशा लोकांच्या मेंदूमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोब सेरेब्रम अधिक सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि मेंदू सक्रिय राहतो. ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगट असलेले लोक याबाबतीत दुसर्‍या क्रमांकावर येतात. या लोकांची बुद्धीही चांगली तीक्ष्ण असते. या रक्तगटाच्या लोकांचे रक्ताभिसरण इतरांपेक्षा चांगले असते. त्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहून स्मरणशक्ती चांगली राहते.

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी रक्तगटाचा असा अभ्यास करण्यासाठी 69 लोकांची पाहणी केली. या लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात आले आणि त्यांच्या मेंदूची स्थिती तपासण्यात आली. या संशोधनात ‘बी पॉझिटिव्ह’ आणि ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा वेगवान असल्याचे दिसून आले.

Back to top button