मुलीला आईकडून मिळू शकते एंग्झायटी! | पुढारी

मुलीला आईकडून मिळू शकते एंग्झायटी!

टोरांटो : एंग्झायटी म्हणजे चिंता व भीतीशी संबंधित मानसिक समस्या. संशोधकांनी म्हटले आहे की मुलीमध्ये अनुवंशिक रूपाने आईकडून ही समस्या येऊ शकते. मात्र, वडिलांकडून मुलामध्ये हा विकार येण्याची शक्यता कमी असते. जर वडिलांमध्ये एंग्झायटी डिसऑर्डर नसेल तर मुलामध्येही हा विकार उद्भवण्याची शक्यता नगण्य असते.

कॅनडामधील डलहौसी युनिव्हर्सिटीतील प्रा. पावलोवा यांनी म्हटले आहे की जर एखाद्या मुलाच्या आई व वडील अशा दोघांनाही एंग्झायटी विकार असेल तर तो मुलामध्येही येण्याची शक्यता अधिक असते. जर दोन मुलं किंवा दोन मुली असतील व दोघांच्या आई-वडिलांनाही हा विकार असेल तर तो या दोन्ही अपत्यांमध्ये समान स्थितीत विकसित होण्याची शक्यता तिप्पटीने वाढते. त्यामुळे ज्या मुलींच्या आईला एंग्झायटीची समस्या आहे त्यांनी याबाबत काळजी घेण्याची गरज निर्माण होते.

विशेष म्हणजे वडील एंग्झायटीने ग्रस्त असले तरी मुलामध्ये हा विकार येण्याचा धोका नसतो. अन्य एका संशोधनातून असे दिसून आले की आई-वडिलांचे अनुकरण करण्याचा मुलांचा स्वभाव असतो. त्यामुळे एंग्झायटीग्रस्त असल्याने आई-वडील जसे वागतात तसेच मुलंही वागू शकतात.

Back to top button