‘हा’ आकडा आहे गणितातील चमत्कार! | पुढारी

‘हा’ आकडा आहे गणितातील चमत्कार!

नवी दिल्ली : गणितामध्ये 1 ते 10 मधील सर्व आकड्यांनी ज्याला भाग जाईल असा आकडा नाही. मात्र, ‘हा’ आकडा अतिशय अनोखा आहे. त्याचा ‘शोध’ लागताच जगभरातील सर्व गणिततज्ज्ञ थक्क झाले व जुन्या धारणा मागे पडल्या. विशेष म्हणजे जगाला ‘शुन्या’ची देणगी दिलेल्या व अनेक महान गणिततज्ज्ञांची भूमी असलेल्या भारतातील एका महान गणिततज्ज्ञाने हा आकडा शोधलेला आहे. हा आकडा आहे ‘2520’.

हा आकडा अन्य अनेक आकड्यांसारखाच असावा असे आपल्याला सुरुवातीला वाटू शकेल. मात्र, वास्तवात तसे नसून हा आकडा अत्यंत विशेष असाच आहे. या आकड्याला 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही आकड्याने भाग जातो, मग तो सम असो किंवा विषम!

पुढील भागाकार पाहिले की आपल्याला त्याची प्रचिती येऊ शकते :

2520÷1=2520, 2520÷2=1260, 2520÷3=840, 2520÷4=630, 2520÷5=504, 2520÷6=420, 2520÷7=360, 2520÷8=315, 2520÷9=280, 2520÷10=252. या 2520 आकड्यामधील रहस्य हे 7×30×12 या गुणाकारात दडलेले आहे. हिंदू कालगणनेनुसार 2520 चे हे कोडे सोडवता येते. आठवड्यांचे दिवस (7), महिन्याचे दिवस (30) आणि वर्षातील महिने (12) म्हणजेच 7×30×12 = 2520. हे काळाचे वैशिष्ट आणि त्याची विशेष सत्ता आहे. हे सर्व कुणी शोधून काढले माहिती आहे का? ही महान व्यक्ती होती श्रीनिवासा रामानुजन. ऐन ब्रिटिश काळात म्हणजेच 22 डिसेंबर 1887 मध्ये रामानुजन यांचा जन्म झाला. उणेपुरे 32 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.

मात्र, या काळात त्यांनी गणित विषयात जी कामगिरी केली त्यामुळे जग आजही थक्क होत असते. त्यांना उपजतच गणित विषयाची असामान्य प्रतिभा लाभलेली होती व या विषयातील खास असे कोणतेही अधिकृत शिक्षण त्यांनी घेतलेले नव्हते. मात्र, त्यांनी गणितातील अनेक शोध लावले, अनेक नवी सूत्रे मांडली आणि ब्रिटनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्येही आपल्या प्रतिभेची मोहोर उमटवली. ते रॉयल सोसायटीचे सर्वात लहान वयाचे फेलो होते. 26 एप्रिल 1920 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Back to top button