जास्त तापमानातही आता आइस्क्रीम वितळणार नाही | पुढारी

जास्त तापमानातही आता आइस्क्रीम वितळणार नाही

बीजिंग : लहान असो वा मोठे, अशा सर्वांनाच आइस्क्रीम खाणे अत्यंत आवडत असते. होरपळून टाकणार्‍या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पदार्थ म्हणून आइस्क्रीमकडे पाहिले जाते. मात्र, आइस्क्रीम खाण्यास जरी उशीर झाला की, ते वितळून जाते. या समस्येवर चीनने असा तोडगा शोधला आहे की, जरी 31 अंश सेल्सिअस तापमान असले तरी वितळू न शकणारे आइस्क्रीम विकसित केले आहे.

खरे तर आइस्क्रीमला फ्रीजमधून बाहेर काढताच ते वितळू लागते. यामुळे तातडीने खाल्ले तरच आइस्क्रीम खाण्याची मजा मिळते; अन्यथा त्याचे पाणीच होऊन जाते. चीनमध्ये प्रसिद्ध असलेल्या नहेपर्सुीशसरे या कंपनीने तयार केलेले आइस्क्रीम 31 अंश सेल्सियस तापमानातही वितळू शकत नाही. चीनमधील सोशल मीडियावर सध्या या आइस्क्रीमची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय यावरून वादही सुरू झाला आहे. जास्त तापमान असले तरी हे थंडगार आइस्क्रीम वितळत नाही, ही बाब लोकांच्या पचनी जराही पडेनाशी झाली आहे.

नहेपर्सुीशसरे या चिनी कंपनीने सांगितले की, आइस्क्रीममध्ये चिकटपणा वाढवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पदार्थांमुळे हे आइस्क्रीम 31 अंश तापमानातही वितळत नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे या आइस्क्रीममध्ये शरीराला कोणतेही हानिकारक ठरणारे घटक नाहीत. याशिवाय ते नॅशनल फूड सेफ्टीने प्रमाणित केले आहेत. खरोखरच जास्त तापमानात हे आइस्क्रीम वितळतेे का, हे पाहण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत आहेत; पण हे आइस्क्रीम काही वितळताना दिसत नाही.

Back to top button