मेंदूच्या ‘कनेक्टिव्हिटी’ला दाखवणारे नवे अ‍ॅल्गोरिदम | पुढारी

मेंदूच्या ‘कनेक्टिव्हिटी’ला दाखवणारे नवे अ‍ॅल्गोरिदम

नवी दिल्ली : भारतीय संशोधकांनी एक नवे अ‍ॅल्गोरिदम विकसित केले आहे जे मेंदूच्या विभिन्न भागांमधील ‘कनेक्टिव्हिटी’ला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तसेच पूर्वानुमान लावण्यासाठी वैज्ञानिकांची मदत करू शकेल. ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (जीपीयू) आधारित हे मशिन लर्निंग अ‍ॅल्गोरिदम बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थान (आयआयएससी) मधील संशोधकांनी विकसित केले आहे.

रेग्युलराईज्ड, एक्सेलेरेटेड, लिनियर फासिकल इव्हॉल्यूएशन नावाचे हे अ‍ॅल्गोरिदम मानवी मेंदूच्या डिफ्यूजन मॅग्नेटिक रेजोनन्स इमेजिंग (डीएमआरआय) स्कॅनने मोठ्या प्रमाणात उत्पन्न डेटाचे वेगाने विश्लेषण करू शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की त्याच्या रिअल-लाईफ उपयोगाने सध्याच्या अत्याधुनिक अल्गोरिदमच्या तुलनेत 150 पटीने वेगाने डीएमआरआय डेटाचे मूल्यांकन केले जाऊ शकते. संशोधक देवराजन श्रीधरन यांनी सांगितले की ज्या कामांसाठी पूर्वी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा वेळ लागत होता, अशी कामे आता काही सेकंद किंवा मिनिटांमध्येच पूर्ण केली जाऊ शकतील.

मेंदूमध्ये प्रत्येक सेकंदाला लाखो न्यूरॉन फायर होतात आणि विद्युत तरंग निर्माण करतात, जे मेंदूत एका बिंदूपासून दुसर्‍यापर्यंत कनेक्टिंग केबल किंवा ‘तंत्रिका फायबर’ (एक्सोन्स)च्या माध्यमातून न्यूरोनल नेटवर्कमध्ये प्रवास करतात. मेंदूद्वारे केल्या जाणार्‍या गणनांसाठी हे कनेक्शन आवश्यक आहे.

Back to top button