Rare Medical Condition | २५ वर्षांचा तरुण, पण शरीर लहान मुलासारखं!

चीनमधील वांग जुनमिंंगची कहाणी
Rare Medical Condition |
Rare Medical Condition | २५ वर्षांचा तरुण, पण शरीर लहान मुलासारखं!
Published on
Updated on

बीजिंग : चीनमधील हुनान प्रांतात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाची थक्क करणारी आणि भावुक करणारी कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वांग जुनमिंंग असे या तरुणाचे नाव असून, त्याचे वय २५ वर्षे असले तरी त्याचे शरीर आणि मानसिक अवस्था एखाद्या लहान मुलासारखीच आहे. एका दुर्मीळ आजारामुळे त्याचे शरीर वाढू शकलेले नाही. त्याची उंची अवघी ६६ सेंटिमीटर (२ फूट २ इंच) आहे.

वांग जुनमिंंगची ही कहाणी तेव्हा जगासमोर आली, जेव्हा त्याच्या लहान बहिणीने, शियाओलिंगने, सोशल मीडियावर त्यांच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळाले आणि वांग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. कुटुंबीयांनी त्याचे नाव प्रेमाने ‘बेबी’ ठेवले आहे. त्याचे वागणे लहान मुलांसारखेच आहे आणि तो रोज रात्री ८ वाजण्यापूर्वी झोपी जातो. त्याच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या आणि वाढत्या वयाच्या खुणा दिसत असल्या, तरी त्याचे लहान शरीर पाहून लोक चकित होतात. सोशल मीडियावरील वाढत्या चर्चेनंतर काही लोकांनी या कुटुंबाला तज्ज्ञ डॉक्टरांशी जोडले.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या तपासणीत डॉक्टरांनी सांगितले की, वांग हा ‘पिट्यूटरी हार्मोनची कमतरता’ या अत्यंत दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहे. या आजारामध्ये मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे संप्रेरक (हार्मोन्‍स) तयार करू शकत नाही. तसेच त्याच्या शरीरात ‘पीओयू१एफ१’ नावाच्या जीन्समध्ये दोष आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा आजार बालपणातच ओळखला गेल्यास उपचाराने बरा होऊ शकतो. वांगच्या पालकांनी लहानपणी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गरिबी आणि आर्थिक अडचणींमुळे ते उपचार पूर्ण करू शकले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news