ईशाची बॉलीवूडमध्ये दशकपूर्ती! | पुढारी

ईशाची बॉलीवूडमध्ये दशकपूर्ती!

ईशा गुप्‍ताला बॉलीवूडमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटांबरोबरच ती आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही झळकत आहे. अलीकडेच ती बॉबी देओलसमवेत ‘आश्रम’ सीरिजच्या सीजन-3 मध्ये झळकली होती. एका मुलाखतीत तिने बॉलीवूडमधील आपल्या दहा वर्षांच्या प्रवासाबाबत सांगितले.

एक ‘आऊटसायडर’ असल्याने इंडस्ट्रीत या स्थानी पोहोचण्याचा रस्ता बराच लांब आणि अडचणींचा होता असे तिने म्हटले आहे. ‘इंडस्ट्रीमध्ये बाहेरून येणार्‍यांना रडण्यासाठी कुणाच्याही खांद्याचा आधार मिळत नाही. इथे कुणीही तुम्हाला योग्य सल्‍ला देणार नाही की मार्गदर्शन करणार नाही. मी ज्या लोकांना भेटले त्यापैकी अतिशय थोडेच सच्चे लोक होते. सध्या माझा एजंटच माझा विश्‍वासार्ह दोस्त आहे!

Back to top button