अॅम्स्टरडॅम : एका डच डिझायनरने जगातील सर्वात महागडी उशी तयार केली आहे. या उशीची किंमत 57 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 45 लाख रुपये आहे. नेदरलँडच्या थिज व्हॅन डेर हिलस्टने ही उशी बनवली आहे.
हिलस्टला ही खास उशी तयार करण्यासाठी तब्बल 15 वर्षे लागली. टेलरमेड पिली ही जगातील सर्वात खास आणि अद्ययावत उशी आहे. ही उशी इजिप्शियन कापूस आणि तुतीच्या रेशमापासून बनवलेली आहे. यामध्ये 24 कॅरेट सोन्याचे कव्हर देण्यात आले आहे. 3-डी स्कॅन वापरून एखाद्या व्यक्तीचे खांदे, डोके आणि मान यांचे अचूक परिमाण काळजीपूर्वक मोजले जाते. हायटेक रोबोटिक मशिन मिल्स वापरून एखाद्या व्यक्तीच्या डोक्याच्या आकाराशी जुळवून घेतले जाते. अशा उशा बनवण्यापूर्वी ग्राहकाच्या शरीराच्या वरच्या भागाचा आकार आणि झोपण्याची मुद्राही लक्षात ठेवली जाते. ही उशी नॉन-टॉक्सिक डच मेमरी फोमने भरलेली असते. तसेच कव्हर सर्व प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अवरोधित करते आणि निरोगी व सुरक्षित झोप घेण्यास मदत करते.