उर्वशी रौतेला झळकली! | पुढारी

उर्वशी रौतेला झळकली!

माजी मिस इंडिया युनिव्हर्स असलेली उर्वशी रौतेला बॉलीवूडमध्ये कमीच दिसत असली, तरी तिच्या सौंदर्याची चर्चा मात्र नेहमी होत असते. कधी पाश्‍चात्त्य पोशाखात, तर कधी अस्सल भारतीय नारी बनून ती आपले हे सौंदर्य दाखवत असते. आता ‘द लिजंड’ या तमिळी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातही ती झळकली आहे.

या कार्यक्रमात ती पिवळी कांजीवरम साडी परिधान करून आली होती. ती येताच कार्यक्रमात सर्व सुंदर्‍यांचे सौंदर्य तिच्यासमोर फिके पडले! ‘द लिजंड’ हा तब्बल 200 कोटी रुपयांच्या तगड्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. त्याच्या ट्रेलर लाँचवेळी उर्वशी दाक्षिणात्य लूकमध्ये आली होती.

Back to top button