जगातील सर्वात मोठी मद्यकुपी! | पुढारी

जगातील सर्वात मोठी मद्यकुपी!

लंडन : जगात विश्वविक्रमही कोणकोणते होतील हे काही सांगता येत नाही. छायाचित्रात जगातील सर्वात मोठ्या आकाराची व्हिस्की बाटली दिसत आहे. या बाटलीची उंची 5 फूट 11 इंच आहे. त्यामध्ये 311 लिटर व्हिस्की असल्याचे सांगण्यात आले. आता या बाटलीचा लिलाव करण्यात आला असून तिला 1.4 दशलक्ष डॉलर्सची किंमत मिळाली आहे.

या बाटलीची ऑनलाईन बोली लागली होती. एका आंतरराष्ट्रीय संग्राहकाने ही बाटली विकत घेतली. ही बाटली 32 वर्षे जुनी आहे. या व्हिस्कीला ‘द इंट्रेपिड’ असे नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारची ही एकच बाटली असून ती 32 वर्षांपूर्वी बनवण्यात आली होती. या बाटलीची नोंद 2021 मध्येच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्येही झाली आहे. या एकाच बाटलीत सामान्य आकाराच्या 444 व्हिस्की बाटल्यांइतकी व्हिस्की राहील असा दावा करण्यात आला होता. ही बाटली फाह माई होल्डिंग्ज ग्रुप आणि रोजविन होल्डिंग्ज पीएलसी यांनी मिळून तयार केली आहे. प्रोजेक्टचे संस्थापक डॅनियल मोंक यांनी सांगितले की त्यांचे वडील कॅप्टन स्टॅनले मोंक यांच्या स्मरणार्थ ही बाटली बनवण्यात आली होती.

Back to top button