सॅटेलाईटने टिपले पाण्यातील ज्वालामुखीला | पुढारी

सॅटेलाईटने टिपले पाण्यातील ज्वालामुखीला

वॉशिंग्टन : जमिनीवर ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना पाहिले जात असते किंवा त्याला कॅमेर्‍यातही टिपून घेतले जात असते. मात्र समुद्राच्या पाण्याखाली ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना कुणी पाहू शकत नाही. आता ‘नासा’च्या एका सॅटेलाईटने पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होत असतानाच्या प्रतिमा टिपल्या आहेत. हे छायाचित्र 14 मे चे असून ‘नासा’च्या लँडसेट-9 सॅटेलाईटने ते टिपलेले आहे.

या छायाचित्रात दिसते की, पाण्याखाली ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे आणि त्याच्या धुळीने पाण्याचा रंगही बदललेला आहे. हा सॅटेलाईट पृथ्वीची हाय रिझोल्युशन छायाचित्रे टिपण्यासाठीच बनवण्यात आलेला आहे. हे छायाचित्र कावाची ज्वालामुखीचे आहे. सोलोमन बेटाजवळ प्रशांत महासागरातील काही सर्वात सक्रिय ज्वालामुखींमध्ये त्याचा समावेश होतो. वांगुनु नावाच्या बेटापासून हा ज्वालामुखी सुमारे 24 किलोमीटर दक्षिणेस आहे. याठिकाणी शार्कच्या दोन प्रजातींचा अधिवास असल्याचे 2015 मधील एका संशोधनातून दिसून आले होते. हे शार्क या ठिकाणच्या खतरनाक, उष्ण आणि आम्लयुक्त पाण्यात राहतात.

Back to top button