कझाकस्तानात 2 हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध

कझाकस्तानात 2 हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध
Published on
Updated on

लंडन : दक्षिण कझाकस्तानाच्या तुर्कीस्तान भागातील प्राचीन दफनभूमीच्या टेकड्यांमध्ये करण्यात आलेल्या उत्खननात दोन हजार वर्षांपूर्वीचे सोन्याचे सुंदर दागिने आढळून आले आहेत. तसेच बाणाचे टोक व एक मोठा ब्राँझचा आरसाही याठिकाणी आढळून आला. तेथील अज्ञात अशा संस्कृतीमधील या वस्तू आहेत. त्या कांगजू राज्याच्या काळातील असाव्यात, असा अंदाज आहे. या सत्तेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. हे राज्य इसवी सनापूर्वी पाचव्या ते चौथ्या शतकात अस्तित्वात होते.

स्थानिक संशोधकांनी म्हटले आहे की, त्या काळात इथे कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे कौशल्य किती मोठे होते, हे यावरून दिसून येते. कांगजू राज्याचे प्राचीन रोम, चीन आणि भारतातील कुशान साम्राज्याशी व्यापारी संबंध होते. याठिकाणी सापडलेला ब्राँझचा आरसा हा चीनमधील हान साम्राज्याच्या काळातील असावा, असे दिसते. हे साम्राज्य इसवी सनापूर्वी 206 ते इसवी सन 220 या काळात अस्तित्वात होते. असे आरसे युरेशियामध्ये अनेक ठिकाणी आढळून आलेले आहेत.

अफगाणिस्तान आणि दक्षिणेकडील उरल प्रदेशातही असे आरसे आढळले होते. ज्या महिलेच्या मृतदेहाशेजारी या वस्तू आढळल्या, ती संपन्न घराण्यातील होती हे स्पष्टच आहे. कझाकस्तानाच्या ओझबेकाली झानीबेकोव्ह युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. तुर्कीस्तानच्या ओर्डाबासिन्स्की जिल्ह्यातील तीन टेकड्यांमध्ये या वस्तू सापडल्या. त्यामध्येच या दोन सुंदर अशा कर्णफुलांचा समावेश आहे. त्यामध्ये लालचुटूक माणके व सफेद रत्ने जडवलेली असून, कर्णफुलांवरील कलाकुसर अतिशय रेखीव आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news