पलोमा धिल्‍लोें लवकरच बॉलीवूडमध्ये

पलोमा धिल्‍लोें लवकरच बॉलीवूडमध्ये www.pudharinews.
पलोमा धिल्‍लोें लवकरच बॉलीवूडमध्ये www.pudharinews.

नवी दिल्ली ः सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनच्या वतीने लवकर पलोमा धिल्लोंला लाँच करण्यात येणार आहे. पलोमा ही सनी देओलचा मुलगा राजवीर देओलसोबत सिल्व्हर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री पूनम धिल्लोंने आपल्या शानदार अभिनयाच्या बळावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

तिने त्रिशूल, काला पत्थर, कर्मा यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. याच अभिनेत्रीची मुलगी आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. पलोमा ही आपला पहिला बॉलीवूडपट सनी देओलचा मुलगा राजवीर देओलसोबत करणार आहे. सूरज बडजात्या यांचे प्रॉडक्शन हाऊस 'राजश्री प्रॉडक्शन'ने पलोमाला लाँच करण्याची तयारी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांचा पुत्र अवनीश बडजात्या करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अवनीश दिग्दर्शक म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news