20 किलोंचा, पण काचेचा ड्रेस | पुढारी

20 किलोंचा, पण काचेचा ड्रेस

नवी दिल्ली ः टीव्ही इंडस्ट्रीच्या ड्रामा क्‍वीनची चर्चा करावयाची झाल्यास सर्वप्रथम राखी सावंतचे नाव येते. मात्र, या यादीत आता उर्फी जावेदचे नाव समाविष्ट झाले आहे. या दोघी नेहमीच आपल्या ड्रेसमुळे चर्चेत असतात. या दोघींचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये या दोघींनीही अनोखे ड्रेस घातले आहेत.

उर्फीने तर कळस करताना चक्‍क काचेच्या तुकड्यांपासून तयार करण्यात आलेला तब्बल 20 किलो वजनाचा ड्रेस परिधान केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत उर्फी आणि राखी या दोघी एकत्रितपणे पोझ देताना दिसत आहेत. याशिवाय राखी ही उर्फीला डान्स शिकवत आहे. स्टेप्स फॉलो करू न शकणारी उर्फी राखीला म्हणते की, मी आपल्यासमोर तडफडणार्‍या माशासारखी आहे. सध्या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button