अखेर मलायका-अर्जुन बांधणार लगीनगाठ! | पुढारी

अखेर मलायका-अर्जुन बांधणार लगीनगाठ!

 पुढारी वृत्तसेवा : अठरा वर्षांच्या संसारानंतर अरबाज खानला घटस्फोट दिल्यावर मलायका अरोरा उघडपणे अर्जुनसमवेत दिसू लागली होती. बारा वर्षांनी लहान असलेल्या अर्जुनबरोबरचे तिचे प्रेमप्रकरण अनेक वर्षे सुरू आहे. आता यावर्षीच्या अखेरीस दोघांनी लग्‍न करण्याचेही ठरवल्याचे वृत्त आहे.

दोघे यावर्षीच्या हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्‍न करतील. कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह केल्यावर दोघे एक शानदार पार्टी देतील, असे त्यांच्या एका निकटवर्तीयाने म्हटले आहे. मलायकाचा 19 वर्षांचा मुलगा अरहान सध्या परदेशात शिक्षण घेत आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button