
पुढारी वृत्तसेवा : बॉलीवूडवर सतत आगपाखड करणारी कंगना रणौत सलमान खान आणि त्याची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीसाठी गेल्यावर चर्चेला ऊत आला होता. आता पंधरा दिवसांनंतर कंगनानेच याबाबतचा खुलासा केला आहे. 'धाकड'निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले, मला पार्ट्यांना जाणे आवडत नाही.
मात्र, सलमान खान माझा चांगला मित्र आहे आणि त्याने फोन करून मला पार्टीसाठी आमंत्रण दिले होते. त्यामुळे मी या पार्टीला गेले. ही एक सामान्य बाब आहे आणि त्यामध्ये विशेष असे काही नाही! अलीकडेच सलमानने कंगनाच्या आगामी 'धाकड'चा ट्रेलर शेअर करून तिला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. कंगनानेही सोशल मीडियातून त्याचे आभार मानले होते. तिने इन्स्टाग्रामवर सलमानची पोस्ट शेअर केली आणि लिहिले, धन्यवाद माझ्या दबंग हीरो, हार्ट ऑफ गोल्ड…मी पुन्हा कधी म्हणणार नाही की मी इंडस्ट्रीत एकटी आहे!