सोनम कपूरने बनवला ‘गोल्डन हेजलनट’ | पुढारी

सोनम कपूरने बनवला ‘गोल्डन हेजलनट’

गर्भवती महिलांना डोहाळे लागतात आणि कुटुंबीय त्यांना हवे ते खाऊ घालून त्यांचे डोहाळे पुरवतही असतात. सोनम कपूरही सध्या गर्भवती आहे आणि कदाचित तिलाही डोहाळे लागले असावेत. मात्र, हॉटेलात जाऊनही तिने स्वतःच आपल्याला हवा तसा पदार्थ बनवला आणि खाल्‍ला! सोनमने याबाबतचा एक व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ लंडनमधील एका हॉटेलचा आहे. आपला आवडता गोड पदार्थ ‘गोल्डन हेजलनट’ बनवत असताना ती यामध्ये दिसते. अर्थात हा पदार्थ ती तेथील शेफच्या मार्गदर्शनाखाली तयार करीत होती. सोनमने हॉटेलमधील हा व्हिडीओ शेअर करताच काही तासांमध्येच त्याला हजारो लाईक्स आणि कमेंटस् मिळाले.

Back to top button