गोल्फ बॉलइतक्या आकाराचा हिरा | पुढारी

गोल्फ बॉलइतक्या आकाराचा हिरा

लंडन ः तब्बल 228.31 कॅरेटच्या पांढर्‍या हिर्‍याचा आता लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठ्या आकाराचा हिरा ठरला आहे. एखाद्या गोल्फ बॉलइतक्या मोठ्या व अतिशय सुंदर अशा या हिर्‍याला लिलावात 30 दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच सुमारे 2 अब्ज 30 कोटी 85 लाख 93 हजार रुपये किंमत मिळेल असा अंदाज आहे.

या हिर्‍याचे नाव आहे ‘द रॉक’. दक्षिण आफ्रिकेतील खाणीत सन 2000 च्या सुरुवातीस हा हिरा सापडला होता. त्याच्या आधीच्या मालकाने त्याला एका नेकलेसमध्ये जडवले होते. यापूर्वी 2017 मधील एका लिलावात 163.41 कॅरेटचा पांढरा हिरा ठेवण्यात आला होता. त्याचा विक्रम आता ‘द रॉक’ने मोडला आहे. ‘क्रिस्टीज’कडून आता या हिर्‍याचा स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये लिलाव केला जाणार असून या हिर्‍याबरोबरच पिवळ्या रंगाच्या एका हिर्‍याचाही लिलाव होईल. या पिवळ्या हिर्‍याचे नाव ‘द रेडक्रॉस डायमंड’ असे आहे.

Back to top button