विंचू एक वर्ष अन्नाशिवाय राहू शकतो ! | पुढारी

विंचू एक वर्ष अन्नाशिवाय राहू शकतो !

नवी दिल्ली : विंचू म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर त्याची विषारी नांगी आणि ‘विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ सारख्या म्हणीची प्रचिती देणारे पाठीवरील पिलावळीचे द़ृश्य समोर उभे राहते.

मात्र, विंचवाचे इतकेच वैशिष्ट्य नसते. हा जीव अनेक बाबतीत अनोखा असतो. तो एक वर्षभर अन्नाशिवाय राहू शकतो. तसेच त्याचे विष अनेक बाबतीत उपयुक्त ठरू शकते.

भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक उष्ण ठिकाणी माती आणि वाळूखाली, दगडकपारीत राहणारे हे जीव आहेत. ‘पॉप्युलर सायन्स’ने विंचवांबाबत एक खास रिपोर्ट बनवला आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की विंचू छोटे किडे, पाली व अगदी छोटे सापही खाऊ शकतात; पण प्रसंगी वर्षभर अन्नाशिवायही राहू शकतात. बहुतांश विंचू हे दोन ते तीन इंच लांबीचे असतात.

छोट्या किड्यांना ते सहज पंज्यांनी पकडू शकतात; पण मोठ्या भक्ष्याला पकडण्यासाठी ते आधी त्याला नांगी मारून विषाने कमजोर करतात आणि पकडतात.

उन्हाळ्यात ते अधिक सक्रिय असतात आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात. हिवाळ्यात ते आपल्या शरीरातील चयापचय क्रिया अतिशय मंद करतात.

त्यामुळे ते वर्षभरही अन्नाशिवाय राहू शकतात.

त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे अतिशय उष्ण ठिकाणी, तप्त वाळवंटातही ते तग धरून राहू शकतात.

जगभरात विंचवांच्या 2500 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी तीस प्रजातींचे विष मानवासाठी धोकादायक ठरू शकते.

Back to top button