Nano Robot : रोगनिदानासाठी नॅनो रोबो शिरणार मेंदूत! | पुढारी

Nano Robot : रोगनिदानासाठी नॅनो रोबो शिरणार मेंदूत!

न्यूयॉर्क : एखाद्या शरीरांतर्गत अवयवाला औषध पुरवण्यासाठी किंवा रोगाचा तपास करण्यासाठी हल्‍ली सूक्ष्म यंत्रांचा वापर वाढला आहे. आताही अमेरिकेतील एका स्टार्टअपने रोगनिदानासाठी नॅनो रोबो विकसित केले आहेत. हे नॅनो रोबो मेंदूचे मोजमाप घेऊ शकतात. तसेच मेंदूत शिरून घातक आजारांचा ग्राफ संगणकावर ऑनलाईन दाखवू शकतात. त्याआधारे या आजारांवर नेमकेपणाने उपचार करता येणे शक्य होईल.

कॅलिफोर्नियातील एका स्टार्टअपने हे नॅनो रोबो विकसित केले आहेत. हे नॅनो रोबो अतिशय सावधगिरीने शरीरात सोडले जातील. त्यानंतर ते सहजपणे मेंदूपर्यंत पोहोचतील आणि आपले काम सुरू करतील. अमेरिकन अन्‍न व औषध प्रशासनाने या रोबोंचा उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली आहे. हे संपूर्ण उपकरण सहजपणे शरीरात फिरू शकते. त्याला सर्वात कमी वीज देयकाची गरज भासते. या उपकरणात विजेचा वापर दहा ते शंभर पटीने कमी होतो. या नॅनो रोबोटस्चे धातूचे आवरण काही मिलीमीटरचे आहे. ते हळूहळू शरीरात इंजेक्ट केले जाते.

नियोजित लक्ष्य जवळ आल्यानंतर ते रॉकेटप्रमाणे अत्यंत वेगाने वाटचाल करते. या प्रयोगात यश आल्यास डँडी वॉकर-सिंड्रोमच्या उपचारासाठी त्याचा वापर केला जाईल. हा एक दुर्मीळ मानसिक विकार आहे. फिटस्, अर्धांगवायू, हृदयाघातसारख्या अन्यही आजारांवर या तंत्राने उपचार करता येणे शक्य होईल.

Back to top button