15 अब्ज किलोमीटरवरून ‘व्होएजर’चा मेसेज

15 अब्ज किलोमीटरवरून ‘व्होएजर’चा मेसेज

वॉशिंग्टनः पृथ्वीपासून सर्वात दूरवर गेलेली मानवनिर्मित वस्तू म्हणजे 'नासा'ने पाठवलेले 'व्होएजर-1' हे अंतराळयान. काही महिन्यांपूर्वी या यानाकडून डेटा मिळवण्यात व्यत्यय येऊ लागला होता. आता 'नासा'ची अनेक दिवसांची मेहनत यशस्वी ठरली आहे. हे 'व्होएजर-1' अंतराळयान पुन्हा कार्यरत झाले आहे. 'नासा'ने जाहीर केले की, 'व्होएजर-1' प्रोबशी अनेक महिन्यानंतर संपर्क साधण्यात आणि डेटा मिळवण्यात यश मिळाले आहे. तब्बल 15 अब्ज किलोमीटरवरून यानाने मेसेज पाठवला आहे.

यानाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पृथ्वीवर डेटा पाठवणे बंद केले होते. या यानाशी संपर्क होत असला तरी माहिती मिळवणे मात्र शक्य होत नव्हते. याबाबतचे काम 'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीकडे (नासा जेपीएल) सोपवण्यात आले होते. या मिशनमध्ये अडथळा निर्माण करणारी चिप संस्थेला मिळाली, त्यानंतर ही अडचण दूर झाली. 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी एक कोड विकसित केला, ज्यामुळे 'व्होएजर-1' मधील तांत्रिक दोष दूर झाला. आता शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, 'व्होएजर-1' पुन्हा त्याची इंजिनिअरिंग सिस्टिम आणि त्याच्या स्थितीबद्दल माहिती पृथ्वीवर उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांना शेअर करत आहे.

नासा व्हॉयेजरच्या द-हँडलवरून शास्त्रज्ञांनी ही बातमी शेअर केली. त्यांनी लिहिले- 'हाय, मी आहे – त1. हे यान अंतराळातील सर्व डेटा शास्त्रज्ञांशी शेअर करेल हे यामुळे नक्की झाले आहे. व्होएजर अंतराळयान 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. ते पृथ्वीपासून 15 अब्ज किलोमीटर दूर आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवरून 'व्होएजर-1'वर संदेश पाठवला जातो तेव्हा अंतराळ यानापर्यंत पोहोचण्यासाठी 22.5 तास लागतात. 'व्होएजर-1'चे यश पाहून शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये 'व्होएजर-2' लाँच केले. दोन्ही अवकाशयानांनी सोबत 'गोल्डन रेकॉर्ड्स' नेले आहेत. ही 12-इंच सोन्याचा मुलामा असलेली तांब्याची डिस्क आहे, ज्याचा उद्देश आपल्या जगाची म्हणजे पृथ्वीविषयीची माहिती भविष्यातील अज्ञात लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

logo
Pudhari News
pudhari.news