‘ही’ बारा ठिकाणे नाहीत गुगल मॅपवर! | पुढारी

‘ही’ बारा ठिकाणे नाहीत गुगल मॅपवर!

न्यूयॉर्क : सध्या रस्ता शोधण्यासाठी सर्रास ‘गुगल मॅप’चा वापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही गन्तव्य स्थानी विनासायास पोहोचण्याची सोय झाली आहे. एखाद्या ठिकाणी जाण्याचा रस्ता माहिती नसला तरी त्याचे नाव ‘गुगल मॅप’ वर टाकले तरी आपल्याला जवळचा रस्ता समजतो. त्यामुळे ‘गुगल मॅप’ ला ठावूक नसलेले ठिकाण नसेल किंवा त्यावर सर्वच ठिकाणे असतील असे आपल्याला वाटू शकते. अर्थातच तसे नाही. जगभरातील किमान बारा ठिकाणे गुगल मॅपवर नाहीत! अशा ठिकाणांमध्ये फ्रान्सच्या ‘प्रिझन डी मोंटल्युकॉन’चा समावेश आहे.

मध्य फ्रान्समधील हा तुरुंग ‘गुगल मॅप’ कधीही दाखवत नाही. सुरक्षेच्या कारणामुळे फे्ंरच सरकारच्या विनंतीवरून 2018 मध्ये हे ठिकाण गुगल मॅपवरून काढण्यात आले होते. दक्षिण प्रशांत महासागरातील मोरुरोआ हे लहान बेटही गुगल मॅपवर नाही. ते का दाखवले जात नाही हे गुलदस्त्यातच आहे. मात्र, या बेटाचा इतिहास अण्वस्त्रांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेतील ओहियोमधील एक ठिकाणही गुगल मॅपवर नाही. तिथे एरियल कॅस्ट्रो नावाच्या एका माणसाने काही मुलींचे अपहरण करून आपल्या कैदेत ठेवले होते. रशियातील जेनेट आयलंड हे 1.2 मैल लांबीचे बर्फाच्छादीत बेटही गुगल मॅपवर अस्पष्ट आहे. रशिया आणि अमेरिकेमधील तणावामुळे हे बेट अस्पष्ट दाखवले जात असल्याचे मानले जाते.

हेही वाचलंत का? 

Back to top button