फूल उमलते बारा वर्षांतून एकदाच | पुढारी

फूल उमलते बारा वर्षांतून एकदाच

नवी दिल्ली : जगभरात हजारो प्रकारची फुलझाडे आढळतात. यामधील बहुतेक झाडांची फुले अत्यंत विशेष असतात. यामध्ये आता केरळमधील एक फूल समाविस्ट करावे लागणार आहे.

केरळमधील इडुक्‍की जिल्ह्यात आढळणारी नीलकुरिंजीची फुले काही साधारण फुले नाहीत. ही फुले अत्यंत दुर्मीळ आहेत. एकदा का हे फूल पाहिले की दुसर्‍यांदा ते पाहण्यासाठी तब्बल 12 वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. उल्लेखनीय म्हणजे नीलकुरिंजी हे एक मोनोकार्पिक फुलझाड असून त्यावर फूल लागताच ते कोमेजून जाते. नीलकुरिंजीचे फूल एकदा का कोमजले की ते पुन्हा पाहण्यासाठी 12 वर्षे वाट पाहावी लागते. सर्वसामान्यपणे नीलकुरिंजीची ही फुले ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत लागतात. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी ही फुले उमलणार आहेत. त्यानंतर ही फु ले पाहण्याची संधी 2033 मध्येच मिळणार आहे.

नीलकुरिंजीचे वैशिष्ट म्हणजे हे फूल केवळ भारतातच उमलते, ते सुद्धा केरळमध्येच. काहीवेळा ही फुले तामिळनाडूतील काही भागातही उमललेली आढळतात. नीलकुरिंजी ही फुले पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक केरळला भेट देत असतात.

Back to top button