शरीरावर कोरून घेतले तब्बल 40 लाखांचे टॅटू | पुढारी

शरीरावर कोरून घेतले तब्बल 40 लाखांचे टॅटू

लंडन : सध्या शरीरावर टॅटू काढून घेणे हा एक फेमस ट्रेंडच बनला आहे. अनेक लोक शौक म्हणून शरीरावर टॅटू काढून येतात. तर काही लोक अन्य अनेक कारणांमुळे टॅटूू काढून घेत असतात. तसे पाहिल्यास सर्वसामान्यपणे लोक आपल्या शरीरावर एक अथवा दोन टॅटूू काढून घेत असतात. मात्र, काही लोकांना टॅटूचे इतके वेढ असते की, ते आपल्या संपूर्ण शरीरावरच टॅटू काढून घेत असतात.

लोक आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्सचे टॅटू काढून घेत असतात. इंग्लंडमधील एका 41 वर्षीय व्यक्तीने आपल्या 90 टक्के शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. शेफिल्ड येथे राहणार्‍या कारैक स्मिथ या चाळीशी उलटलेल्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षांपासूनच शरीरावर टॅटू काढून घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आतापर्यंत त्याने अनेक टॅटू काढून घेतले आहेत. केवळ गाल आणि नाक सोडले तर संपूर्ण शरीरावर त्याने टॅटू काढून घेतले आहेत.

कारैक स्मिथने सांगितले की, मी ज्या मुलांसोबत काम करतो, त्यांना टॅटू फारच आवडतो. त्यांच्या विनंतीमुळे मी टॅटू काढून घेत असतो. केवळ टॅटूमुळेच मला टी.व्ही. शोमध्ये एक कॉल आला होता. आजपर्यंत शरीरावर मी अनेक डिझाईन्सचे टॅटू काढून घेतले आहेत. टॅटूच्या वेढापायी मी आजपर्यंत सुमारे 40 लाख रुपये खर्च केले आहेत. काहीवेळा टॅटू कोरण्यासाठी मला मोफत शाही मिळते. तर काहीवेळा कलाकार मोफत टॅटू काढतात. मात्र, यावर आजपर्यंत 40 लाख रुपयांहून अधिक खर्च झाले आहेत.

 

Back to top button