१४ वर्षांचा राष्ट्राध्यक्ष!

१४ वर्षांचा राष्ट्राध्यक्ष!

मेलबर्न : एरवी 14 वर्षांचा एखादा मुलगा अभ्यासात हुशार असू शकतो, खेळात प्रवीण असू शकतो आणि सृजनशीलही असू शकतो. पण, या वयात एखाद्या मुलाने चक्क नवा देशच उभारला, त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:ला घोषित केले आणि त्या देशात काही जण येऊन बस्तानही मांडू लागले, तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ज्या वयात शिक्षणाकडे लक्ष द्यावे, त्या वयात देश उभारून त्याची जबाबदारी हाताळणार्‍या या अवलियाचे नाव डॅनिएल जॅक्सन असे आहे.

डॅनिएलने साधारणपणे 5 वर्षांपूर्वी आपल्या काही सहकार्‍यांना समवेत घेत हा अनोखा इतिहास रचला. डेली स्टारने दिलेल्या या वृत्तानुसार, दैनुबे नदीजवळ द फ्री रिपब्लिक ऑफ व्हर्डिस नावाचा देश आहे. अर्थात, हा देश केवळ 0.2 स्क्वेअर मैल अंतरात म्हणजे एखाद्या पार्कपेक्षाही कमी जागेचा आहे. या जागेवर कोणाचाही कब्जा नव्हता. त्यामुळे मी ही जागा ताब्यात घेतली आणि येथे देश स्थापन केला, असे डॅनिएल जॅक्सनचा दावा आहे. आश्चर्य म्हणजे या पार्कवजा देशात पोहोचण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे आणि 5 मैलाचे अंतर नावेने पार केल्यानंतरच तेथे पोहोचता येते.

आतापर्यंत 400 नागरिकांनी या देशाचे नागरिकत्व घेतल्याचा आणि आणखी 15 हजार जण इच्छुक असल्याचा डॅनिएलचा दावा आहे. आता या ठिकाणी पायाभूत सेवासुविधा म्हणून काहीच नसल्याने इथे कोण राहण्यासाठी इच्छुक असेल, हा प्रश्नच आहे. मात्र, डॅनिएलने मात्र हार मानलेली नाही. येथे नजीकच्या काळात 5 स्वतंत्र प्रकाराच्या व्यवस्था उभारण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असे तो म्हणतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news