समुद्रातील 12 हजार वर्षांपूर्वीच्या शहराचा शोध | पुढारी

समुद्रातील 12 हजार वर्षांपूर्वीच्या शहराचा शोध

न्यूयॉर्क : एका अमेरिकन पुरातत्त्व संशोधकाने दावा केला आहे की त्याने समुद्रात 12 हजार वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष शोधले आहेत. क्रॅकपॉट जॉर्ज गेल असे या संशोधकाचे नाव आहे. प्राचीन काळी मेक्सिकोमधील एक शहर असे ‘समुद्रार्पण’ झाले होते! मेक्सिकोच्या सेंट बर्नार्ड येथील किनारपट्टीजवळ समुद्रात या शहराचे अवशेष असल्याचा दावा या संशोधकाने केला आहे.

क्रॅकपॉट यांनी म्हटले आहे की या शहरात ‘एनर्जी फिल्ड’ आणि अनेक पिरॅपिडस्ही आहेत. समुद्रतळाशी तेथील इमारतींचे दगड असून या रहस्यमय शहराचे निरीक्षण करण्यासाठी आपण 44 वेळा तिथे गेलो होतो असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात अन्य संशोधक या दाव्यावर अधिक विश्वास ठेवत नसल्याचे दिसून आले.

या शहराच्या मध्यभागी एक पिरॅमिड असल्याचेही क्रॅकपॉट यांचे म्हणणे आहे. तेथील शेकडो इमारतींचे अवशेष वाळू आणि गाळात दबलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅ्रकपॉट हे गेल्या सुमारे 50 वर्षांपासून इमारतींचे अवशेष आणि मोठे पिरॅमिड यांच्यावर संशोधन करीत आहेत. या शहराला ते ‘ग्रॅनाईटचे शहर’ असेही संबोधतात. तिथे मच्छीमारांच्या जाळ्यात अनेक वेळा वेगळे खडक अडकल्याचे आढळून आले होते, असे त्यांनी सांगितले.

Back to top button