पुरुषांमध्ये हार्टअ‍ॅटॅकचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त | पुढारी

पुरुषांमध्ये हार्टअ‍ॅटॅकचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त

वॉशिग्टंन : कमी वयात हार्टअ‍ॅटॅकने होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात वेगाने वाढ होताना दिसत आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हार्टअ‍ॅटॅकचे प्रमाण जास्त असल्याने एका अहवालातून सिद्ध झाले आहे. यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनच्या (सीडीसी) माहितीनुसार हृदयासंबंधीच्या आजारांमुळे दरवर्षी होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात वाढच होत आहे.

अमेरिकेत दरवर्षी सुमारे 7 लाख 35 हजार लोक हार्टअ‍ॅटॅकच्या धक्क्याने मरण पावतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, महिलांच्या तुलनेत पुरुषांना हार्टअ‍ॅटॅकचा जास्त धोका असतो. 2016 मध्ये ‘जामा इंटरनल मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या नॉर्वेच्या ट्रोम्होच्या माहितीनुसार ठराविक वयानंतर महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराच्या धक्क्याचा धोका वाढत असतो.

या संशोधनादरम्यान सुमारे 34 हजार स्त्री पुरुषांच्या आरोग्याचे निरीक्षण केले. याशिवाय 1979 ते 2012 या काळात हार्टअ‍ॅटॅकचा अनुभव शेअर करणार्‍या 2800 लोकांवरही नजर ठेवण्यात आली होती. यादरम्यान, संशोधकांनी कोलेस्ट्रॉलची पातळी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि बॉडी मास इंडेक्स तसेच फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीवर बारकाईने नजर ठेवली होती.

दरम्यान, जॉन हॉपकिन्स सिकारॉन सेंटर फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसिजचे क्लिनिकल रिसर्च डायरेक्टर मायकेल जोसेफ यांनी सांगितले की, पुरुषांना 45 तर महिलांना 55 वर्षांनंतर हार्टअ‍ॅटॅकचा धोका वाढतो. मेनोपॉजपूर्वी अ‍ॅथेरोस्क्लेरोसिसमुळे महिलांचा हार्टअ‍ॅटॅकपासून बचाव होतो.

Back to top button