वनस्पतींपासून बनवलेले ‘शाकाहारी’ मांस!

वनस्पतींपासून बनवलेले ‘शाकाहारी’ मांस!

लंडन : सध्या जगभर अनेक लोक शाकाहारीच नव्हे तर 'वेगन'ही बनत आहेत. हे 'वेगन' लोक मांसाहाराबरोबरच अंडी, दूध असा कोणताही पशुजन्य आहारही घेत नाहीत. आता जगभरात मांसाला 'शाकाहारी' पर्यायही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. आपल्याकडे मांसाहार सोडलेले अनेक शाकाहारी लोक सोया चंक्स, फणसाची भाजीसारखे पर्याय निवडत असतात. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून वनस्पतींपासून बनवलेले 'मांस'ही उपलब्ध होत आहे. त्याला 'प्लँट मीट' असे संबोधले जाते.

हे प्लँट मीट तयार करण्यासाठी प्रोटिन, ग्लुटेन, नारळाचे तेल, मसाले, सोया, बीटाचा रस, तांदूळ आदींचा वापर होतो. 2020 मध्ये अशा वनस्पती आधारित मांसाच्या बाजाराचे वैश्विक अनुमानित मूल्य 4.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते आणि 2025 पर्यंत त्यामध्ये 14 टक्के वाढ होऊन 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स होईल असा अंदाज आहे. भारताची सुमारे 30 टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे. उर्वरित 70 टक्के लोक मांसाहारी असले तरी शाकाहार अधिक प्रमाणात करतात.

भारतीय लोक वनस्पतीजन्य आहार अधिक घेत असले तरी आता भारतातही वनस्पतीजन्य नकली मांसाची मागणी वाढत आहे. अशा नकली मांसात सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरीज खर्‍या मांसापेक्षा कमी असतात. त्यामध्ये अँटिऑक्सिडंटस्, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे चवीबरोबरच आरोग्यासाठीही ते लाभदायक ठरते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news