सिडनी : 25 कोटी वर्षांपूर्वीच्या सागरी विंचवाचे जीवाश्म | पुढारी

सिडनी : 25 कोटी वर्षांपूर्वीच्या सागरी विंचवाचे जीवाश्म

सिडनी : ऑस्ट्रेलियात एका अशा प्रजातीच्या विंचवाचे जीवाश्म सापडले आहे जे सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. या प्रजातीचे नाव आहे ‘वूडवार्डोप्टेरस फ्रीमॅनोरम’. त्याला ‘सागरी सैतान’ असेही म्हटले जाते. अर्थात हा विंचू केवळ समुद्रातच नव्हे तर नद्या आणि सरोवरांमध्येही आढळत असे.

या विंचवाची लांबी एक मीटर होती. ताज्या पाण्यात राहणे त्याला अधिक पसंत असे. क्‍वीन्सलँडमधील एका म्युझियममध्ये त्याचे जीवाश्म ठेवले असून त्यावर बर्‍याच काळापासून संशोधन सुरू होते. मध्य क्‍वीन्सलँडमधील ग्रामीण भागात 1990 च्या काळात हे जीवाश्म सापडले होते. या जीवाश्माची तुलना विंचवांच्या अन्य प्रजातींशी करण्यात आली. त्यांच्यामधील साम्य आणि भेद तपासून पाहण्यात आले. कोरोना काळात म्युझियम लोकांसाठी बंद असल्याने या काळात संशोधनाचे काम मात्र वेगाने झाले. हे जीवाश्म एखाद्या अन्य प्रजातीपेक्षा सुमारे एक कोटी वर्ष आधीचे असल्याचे सांगण्यात आले. क्‍वीन्सलँड म्युझियमचे अधिकारी अँड्र्यू रोजेफेल्डस् यांनी सांगितले की या सागरी विंचवाचे जीवाश्म कोळशामध्ये सुरक्षित राहिले होते व ते सुमारे 25.2 कोटी वर्षांपूर्वीचे आहे.

Back to top button