

लंडन : वयाच्या १२ व्या वर्षी सामान्यतः एखादे मूल आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. मित्र बनवणे, नवीन खेळ शोधणे आणि घर व शाळेतील बदलांशी जुळवून घेणे यातच त्याचा वेळ जातो. मात्र, ब्रिटनमध्ये याच वयाचा एक मुलगा मानवी जगतापेक्षा वेगळ्या अशा वन्यजीवांच्या विश्वाला आणि त्यांच्या वर्तनाला अधिक उत्तम प्रकारे समजून घेत आहे.
दक्षिण लंडनच्या कॅंबरवेल येथे राहणाऱ्या या चिमुकल्याचे नाव लिओ सोर्देलो-सावाला असे आहे. लिओने स्वतःची संवर्धन मोहीम सुरू केली असून, त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२९ ऑक्टोबर रोजी भव्य ध्येय बाळगणारा हा तरुण चळवळवाला पॅलेस ऑॅफ वेस्टमिस्टर येथे 'BCyA मेडल ऑफ ऑनर' देऊन सम्मानित करण्यात आला.
त्याच्यासोबत देशभरातील इतर अनेक तरुणही उपस्थित होते, ज्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. बहुतांश लहान मुले या वयात आपल्याला नक्की काय आवडते हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, लिओ सोर्देलो-सावाला याचे व्यक्तित्व वेगळे आहे. प्राण्यांच्या असीम प्रेमापोटी त्याने आधीच स्वतःची संवर्धन मोहीम सुरू केली आहे. तो पोपट आणि चित्त्यांच्या संरक्षणासाठीच्या मोहिमांमध्ये हिरीने सहभागी होत आहे.
'लंडन पोस्ट' आणि 'साऊथवार्क न्यूज ऑनलाइन'च्या वृत्तानुसार, दक्षिण लंडनच्या कॅंबरवेल येथील या १२ वर्षीय मुलाने आपल्या बालपणाचा एक मोठा काळ समाजसात बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांमध्ये घालवला आहे. यामध्ये दुर्लभ व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींवर व्हिडिओ तयार करणे, शाळांमध्ये निधी संकलनाचे (फंड रेझिंग) उपक्रम आयोजित करणे आणि 'रीवाइल्डिंग' (निर्गला त्याच्या मूळ जंगली रूपत परत आणणे) प्रकल्पांना पाठिंबा देणे यांचा समावेश आहे.
ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, लिओचा हा प्रवास सात वर्षांपूर्वी सुरू झाला होता. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या इतर तरुण मुलांना एकत्र आणणे आणि वन्यजीव संवर्धनासाठी काहीतरी अर्थपूर्ण काम करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
एका व्यक्तिगत प्रकल्पाच्या रूपत सुरू झालेल्या या उपक्रमाचे पुढे 'लिओज ॲनिमल प्लॅनेट'मध्ये रूपांतर झाले आहे. आज हे माध्यम यूट्यूब, पॉडकास्ट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विस्तारले आहे. 'लंडन पोस्ट'नुसार, विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याचे ३५,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.
या माध्यमातून तो प्राण्यांशी जोडलेली रंजक तथ्ये, शैक्षणिक व्हिडिओ आणि नामशेष होत चाललेल्या प्रजातींविषयी माहिती शेअर करतो. त्याचे हे प्रबोधनात्मक कंटेट तरुणांमध्ये वन्यजीव संवर्धनाचा विषय सोपा करणे आणि निसर्गाशी असलेल्या नातेकायडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी त्यांना प्रेरित करणे या उद्देशाने तयार केले जाते.