प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे ‘ही’ होते हानी | पुढारी

प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे ‘ही’ होते हानी

नवी दिल्ली : प्रोटिन्स म्हणजेच प्रथिने ही आपल्या शरीरातील ‘बिल्डिंग ब्लॉक्स’ असतात. नव्या पेशी तयार करणे, स्नायू मजबूत करणे यासाठी प्रोटिन्सची गरज असते. प्रोटिन्सची कमतरता निर्माण झाली तर अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात.

शरीरात प्रोटिन्सचे प्रमाण पुरेसे नसले तर हाडे कमजोर होतात. त्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही घटते. त्यामुळे विविध प्रकारचे संक्रमण होण्याचा धोका वाढतो. प्रोटिनच्या कमतरतेचे एक सामान्य लक्षण फॅट हे आहे. विशेषतः यकृताच्या पेशींमध्ये फॅट जमा होते व फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते.

शरीराच्या योग्य विकासासाठी शरीरात प्रोटिन आवश्यक असते. त्यामुळे लहान मुलांना प्रोटिनयुक्त आहार देणे गरजेचे ठरते. प्रोटिनच्या कमतरतेमुळे त्वचा लाल होणे, नखे तुटणे, केस गळणे, केसांचा रंग फिका होणे आदी लक्षणे दिसून येतात. तसेच प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे स्नायूंची मोठी हानी होते. दूध, अंडी, कडधान्ये, वेगवेगळ्या शेंगांच्या बिया, चिकन, मटण, मासे, शेंगदाणे व सुका मेवा यामधून प्रोटिन्स मिळते.

Back to top button