2080 पर्यंत समुद्रातील 70 टक्के ऑक्सिजन कमी होण्याचा धोका | पुढारी

2080 पर्यंत समुद्रातील 70 टक्के ऑक्सिजन कमी होण्याचा धोका

लंडन : 2080 सालापर्यंत जगभरातील समुद्रांमधील 70 टक्के ऑक्सिजन कमी होईल व त्याचा फटका अनेक जलचरांना बसेल असा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. क्लायमॅट चेंज म्हणजेच हवामानातील बदलांमुळे समुद्रांमध्ये केवळ तीस टक्केच ऑक्सिजन शिल्लक राहील असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

समुद्रांच्या किनारपट्टीलगतच्या भागातील ऑक्सिजनचा स्तर सातत्याने कमी होत चालला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. याच भागात सर्वाधिक मासे आढळून येत असतात. याच ठिकाणातून जगभरात सर्वाधिक मासेमारी केली जाते व मत्स्यव्यवसाय चालतो. मात्र, अशा ठिकाणीच सातत्याने ऑक्सिजनचे प्रमाण घटत चालले आहे. 2021 मध्ये संपूर्ण जगातील समुद्रांमध्ये ऑक्सिजनचा स्तर गंभीर पातळीवर गेला होता.

ज्याप्रमाणे जमिनीवरील सजीव हवेतील ऑक्सिजन श्वसनासाठी घेतात त्याचप्रमाणे समुद्रात मिसळलेला ऑक्सिजन जलचर घेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून संशोधक समुद्रातील कमी होत चाललेल्या ऑक्सिजनला ट्रॅक करीत आहेत. हळूहळू समुद्रांमधील ऑक्सिजन संपून जाईल व ही ‘डीऑक्सिजेनेशन’ची क्रिया सजीवांसाठी घातक ठरेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

Back to top button