केवळ पाच इंच उंची वाढविण्यासाठी खर्च केले 1.4 कोटी

केवळ पाच इंच उंची वाढविण्यासाठी खर्च केले 1.4 कोटी

वॉशिंग्टन : अमेरिकेत एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. 5 फूट 5 इंच उंच असलेल्या एका व्यक्तीने आणखी 5 इंच उंची वाढवण्यासाठी 1.4 कोटी रुपयांपेक्षा (170,000 अमेरिकन डॉलर्स) जास्त खर्चाच्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया करवून घेतल्या.

उंची कमी असल्यामुळे कोणतीही मुलगी आपल्याला डेट करत नाही, असे त्याला वाटत होते. यामुळेच त्याने आपली उंची वाढवण्यासाठीची शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला.

द कॉस्मेटिक लेनने दिलेल्या माहितीनुसार, मोझेस गिब्सन असे या व्यक्तीचे नाव आहे. गिब्सनने 2016 मध्ये एक शस्त्रक्रिया करवून घेतआपली उंची 5 फूट 5 इंचांवरून 5 फूट 8 इंच केली. सध्या त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया सुरू आहे. यामुळे त्याची उंची जूनपर्यंत 5 फूट 10 इंचांवर पोहोचेल. कॉस्मेटिक लेनने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गिब्सनच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.

या व्हिडीओत मोझेस आपल्या डेटिंग जीवनाबद्दल सांगत आहे. त्याने सांगितले की, उंची वाढवण्यासाठी अनेक औषधांची तसेच आध्यात्मिक डॉक्टरचीही मदत घेतली. शेवटी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

महागड्या शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा करण्यासाठी त्याने दिवसा सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. रात्री उबेरसाठी गाडी चालवली. 2016 मध्ये त्याने पहिली शस्त्रक्रिया करवून घेतली. ज्यामुळे त्याची उंची 5 फूट 8 इंच झाली. गेल्या महिन्यात त्याने दुसर्‍या शस्त्रक्रियेसाठी आणखी 98,000 डॉलर्स खर्च केले. येत्या जूनमध्ये गिब्सनची उंची 5 फूट 10 इंच होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news