येड लागलं प्रेमाचं : राया आहे तरी कसा? अभिनेता विशाल निकमने उलगडलं रहस्य

येड लागलं प्रेमाचं
येड लागलं प्रेमाचं
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : २७ मे पासून सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून विशाल निकम हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. याआधी दख्खनचा राजा जोतिबा आणि साता जन्माच्या गाठी या स्टार प्रवाहच्या मालिकेतून विशालचा निराळा अंदाज प्रेक्षकांनी पाहिला आहे. येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या निमित्ताने विशाल निकमने आपल्या भूमिकेचं वेगळेपण सांगितलं.

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना विशाल निकम म्हणाला – मी या मालिकेत राया हे पात्र साकारत आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. फणसासारखा वरवर काटेरी आणि कठोर वाटणारा राया आतून मात्र इमोशनल आहे. अनाथ मुलं आणि आजारी लोकांबद्दल त्याला विशेष आस्था आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या आईला गमावलं. त्यामुळे स्त्रियांना तो मान देतो. कुठेतरी त्याच्याही नकळत तो आईचं प्रेम शोधतो आहे. रायाला खोटं बोलणं सहन होत नाही. कितीही वाईट असलं, कटू असलं तरी खरंच बोलायचं असं त्याचं मत आहे. रायाची विठ्ठलावर प्रचंड श्रद्धा आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखील पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.

मालिकेत विशालसोबत पुजा बिरारी दिसणार आहे. याविषयी सांगताना तो म्हणाला, पुजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पुजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत. मालिकेत मंजिरी आणि रायाचे विचार फार वेगळे आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात माझी आणि पुजाची छान मैत्री आहे. राया – मंजिरीच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं हिच इच्छा. नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news