Virat-Anushka Baby : विराट-अनुष्काला मुलगा झाला; दुसऱ्या बाळाच्या स्वागतानंतर दोघांनी केली ‘या’ नावाची घोषणा
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना पुत्ररत्न (Baby) प्राप्त झालं आहे. अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. मुलाच्या नावाविषयी देखील अनुष्काने खुलासा केला. अनुष्काने दिलेल्या खुशखबरीमुळे आता विराट आणि अनुष्काच्या फॅन्सला आनंद गगनात मावेना झाला. मात्र, आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती अनुष्काने फॅन्सला केली आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने 15 फेब्रुवारी रोजी पुत्रप्राप्ती झाल्याचे सांगितले आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर मुलाचे नावाची देखील घोषणा केली आहे. अकाय (Akaay) हे नाव चिमुकल्याचं असेल असे सांगितले आहे. अनुष्काने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आम्हा दोघेही खूप आनंदी आहोत, आम्हाला सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या लहान मुलाचे म्हणजेच वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले आहे. या आमच्या बाळाचे नाव अकाय असे ठेवले आहे. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छा राहूदेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की यावेळी आम्ही ठेवेलेल्या गोपनीयता समजून घ्यावी." (Virat-Anushka Baby)
दरम्यान, विराट कोहलीचा खास मित्र आणि साऊथ अफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने याबाबत खुलासा केला होता. मात्र, त्याने नंतर बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. अशातच आता एबी डिव्हिलियर्सचं खरं बोलला होता, हे स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड कपवेळी जेव्हा अनुष्का सामना पाहण्यासाठी येत होती, तेव्हापासून अनुष्का गरोदर असल्याची चर्चा होती. आता खुद्द अनुष्काने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. (Virat-Anushka Baby)
अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनुष्का आणि विराट माध्यमांपासून दूर असल्याचे सगळ्यांनी पाहिले होते. कौटुंबिक कारणास्तव विराट मॅच खेळत नसल्याचं म्हटलं जात होतं. याआधी विराट – अनुष्का यांना एक मुलगी असून ते नेहमीच माध्यमांपासून आपल्या मुलीला लांब ठेवत असल्याचे पाहायला मिळते. आज दुसऱ्या बाळाची माहिती दिल्यानंतर सोशल माध्यमांवर या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा
- WhatsApp Secret Code Feature: आता स्क्रीन चॅटींग होणार सुरक्षित! व्हॉट्सॲपवर येणार भन्नाट फिचर
- Virat Anushka Reaction : केएल राहुलचा विराटनं घेतला कॅच अन् अनुष्कानं मारल्या उड्या, रिॲक्शनचा व्हिडिओ व्हायरल
- Virat Anushka : अनुष्का विराटला करत आहे मिस; म्हणाली "जग अधिक उजळ.."
- Virat-Anushka : पराभवानंतर विराट भावूक अश्रू झाले अनावर; अनुष्काने मिठी मारुन सावरलं
- Anushka and Virat : विराटसाठी गुड न्यूज निश्चित, अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई
- Anushka-Virat : अनुष्का कार्यक्रमात पडणार तेवढ्यात विराटनं असं काय केलं की…
- Anushka Sharma Virat Kohli : "ओह माय गॉड.. अनुष्काच्या भीतीने विराट अजूनही…

