PM Modi Share Viral video : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर PM मोदींनी शेअर केला ‘तो’ व्हायरल व्हिडिओ
पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येमधील राम मंदिरात आज (दि. २२) अभूतपूर्व उत्साहात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळदरम्यान आणि त्यानंतर रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. सोशल मीडियावरही प्रभू श्री रामाबद्दल अनेक पोस्ट केल्या जात आहेत. लोक भजने गात त्यांचे व्हिडिओही यूट्यूबवर शेअर करत आहेत. यातील अनेक व्हिडिओंना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी एक व्हायरल व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. (PM Modi Share Viral video)
सध्या सोशल मीडियावर प्रभू श्री रामाच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. आज (दि. 22) अयोध्येतील भव्य राम मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या सुवर्ण क्षणांमुळे सर्व देशवासीय खूप आनंदीत दिसत आहेत. पीएम मोदींसह अनेक बॉलीवूड स्टार्स, क्रिकेटर्स आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्तींनी आंदोत्सव साजरा केला. प्रभू रामाच्या भक्तांनी राम भजन गातानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पीएम मोदींनी शेअर केलेला व्हिडिओ तमिळ भाषेत
एक्स या सोशल मीडिया माध्यमावर पीएम मोदींनी ही पोस्ट केली आहे. यामध्ये ही भजनाची व्हिडिओ आहे, तसेच त्यावर लिहिले आहे की, भार्गवी वेंकटराम यांनी तमिळ भाषेत भगवान श्री रामाचे भजन गायले आहे. असा मजकूर देखील पोस्ट केला आहे. या मूळ व्हिडिओला कोटींमध्ये व्ह्यूज आहेत. पीएम मोदींनी हा व्हिडिओ शेअर केल्याने या व्हिडिओचे व्ह्युअर्समध्ये आणखी वाढ होत आहे.
हेही वाचा

