

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्या टप्प्यातील पाचही निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एक सक्षम उमेदवार दिलेला आहे. उद्या परवा सर्व उमेदवारांचे नामांकन, फॉर्म भरायची प्रक्रिया पार पडणार आहे.मी स्वत: नागपूरसह रामटेकला जाणार आहे. जिथे मला जाता येईल, मी पाचही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, कधी नव्हे अशी २०१४ आणि २०१९ ला भाजपला उमेदवार घोषित करताना दमछाक झाली. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार पळवावे लागले. भाजपची दयनीय अवस्था मला सध्या दिसतेय. त्यांनी ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली, ते इच्छुक नाहीत, तरीही काही मतदार संघात जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात वरमाला घालायचे काम झाले. पहिल्या टप्प्यातच उमेदवारी देताना भाजपला घाम सुटलेला आहे आणि ही भाजपची दयनीय अवस्था मला दिसत आहे.