Latur Yatra Jalpari show: लातूर ग्रामदैवतेच्या यात्रेतील जलपरी वादात; तरुणांना अश्लील इशारे? पाहा, नेमका प्रकार काय?

Latur Siddheshwar Yatra Jalpari show: लातूर यात्रेतील आकर्षणाचे केंद्र ठरलेली 'जलपरी' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिल्यांदाच आलेल्या या आगळ्या वेगळ्या जलपरीने अनेकांच लक्ष वेधून घेतलय.

Latur Siddheshwar Yatra Jalpari show:

लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा या यात्रेतील आकर्षणाचे केंद्र ठरलेली 'जलपरी' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लातूरमध्ये पहिल्यांदाच आलेल्या या आगळ्या वेगळ्या जलपरीने अनेकांच लक्ष वेधून घेतलय.

लातूरच्या यात्रेत यंदा पहिल्यांदाच 'जलपरी' आणि 'मिनी काश्मीर' हा शो आयोजित करण्यात आला आहे. यासाठी १०० रुपये तिकीट आकारले जात असून, संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शकांसाठी हा शो खुला असतो. एका मोठ्या काचेच्या पाण्याच्या टाकीत जलपरीच्या वेशातील मुली विविध हालचाली आणि जलक्रीडा करून दाखवतात.

हे आगळेवेगळे सादरीकरण पाहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, टाकीतील जलपरींकडून प्रेक्षकांना खुणावले जात असल्याचा आणि अश्लील इशारे केले जात असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. या गर्दीत काही ठिकाणी हुल्लडबाजीचे प्रकारही घडत असून, यामुळे यात्रेच्या पावित्र्याला तडा जात असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news