

पढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा आल्यावर सर्वांनाच थंडगार समुद्र किनाऱ्यांची ओढ लागते. अनेकजण समुद्रकिनारी भटकण्याचे आणि त्यात डुबण्याचे प्लॅन करत असतात. सामान्यांसह हा मोह सेलेब्सना सुद्धा आवरत नाही. अभिनेत्री वाणी कपूरने (Vaani Kapoor) या उन्हाळ्याच्या कडाक्याला पाहून तिचा अशाच एका सुट्टीतील सुमुद्र किनाऱ्यावरील बिकीनीतील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटो ती पिंक कलरच्या बिकीनीमध्ये समुद्राच्या पाण्यात जाताना दिसत आहे. तिचा हा बिकीनीतील मादक फोटो पाहून आधीच उकाड्याने बेजार झालेल्या तिच्या चाहत्यांची अवस्था अजून 'हॉट' झाली आहे. सौदर्यसंपन्न वाणी कपूरने या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये मी समुद्रकिनाऱ्याला मिस करत असल्याचे म्हटले आहे.
अत्यंत बेधडक, बिनधास्त आणि बोल्ड अशी वाणी कपूरची (Vaani Kapoor) बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे. तिचे व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि तिच्या मादक अदांनी तिने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे. ती नेहमी विविध समाज माध्यमांवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्याशी शेअर करते. जसे की हा खालील फोटो तिने शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका सीनच्या चित्रकरणाआधी मेकअप करताना दिसत आहे.
या शिवाय वाणी कपूरने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आईसक्रीम खाताना दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांना पुन्हा उन्हाळ्याच्या उकाड्याची आठवण तर करुन देत नाहीस ना असेच वाटते. कारण ती एका स्विमिंग टँक शेजारी मस्त आईसक्रिमचा आस्वाद घेताना दिसत आहे. तिची आईसक्रिम खाण्याची अदा पाहून तिच्या चाहत्यांच्या तोंडा देखिल पाणी सुटेल.
यासह तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती किती फॅशनेबल आहे हे तिने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोत वाणी स्लीव्हलेस डीप कट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. एका पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी तिने हा ड्रेस परिधान केला होता. यात तिने चमकदार आणि चकचकीत मेकअप केला आहे. या अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये तीने अनेकांना अक्षरशा: मोहित करुन टाकले आहे.