Uttarkashi Tunnel Rescue: बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानात्मक, जाणून घ्या काय आहे कारण?
पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ऑगर मशीनचे ब्लेड कापण्याचे काम सकाळपासूनच अव्याहतपणे सुरू आहे. हैदराबादहून प्लाझ्मा कटर मागवण्यात आल्याने बचावकार्याला वेग आला आहे. दरम्यान व्हर्टिकल खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे असणार आहेत. ( Uttarkashi Tunnel Rescue)
Uttarkashi Tunnel Rescue: बचावासाठी'मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग' सुरू
उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ४१ कामगार अडकले आहेत. कामगारांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून बचावकार्य राबवले जात आहे. दरम्यान परदेशी ऑगर ड्रिलिंग मशीन बचाव कार्यात अपयशी ठरल्यानंतर 'व्हर्टिकल ड्रिलिंग' ला सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी मॅन्युअल ड्रिलिंगचा मार्ग अवलंबण्यात सुरूवात केली आहे असे बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.
आता मनोधैर्य राखण्यासाठी 'लढाई'
बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुटकेसंदर्भात अनिश्चितता असल्याने प्रशासन आणि बचाव यंत्रणेकडून त्यांची सर्वपातळीवर दक्षता घेतली जात आहे. कामगांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी देखील घेतली जात आहे. कामगारांची मानसिक स्थिती चांगली राहावी म्हणून, प्रशासनाकडून त्यांना मनोरंजनाचे साहित्य पुरवले जात आहे. कामगारांना लुडो सारखे व्हिडिओ आणि बोर्ड गेम खेळण्यासाठी मोबाईल फोन देण्यात आले आहेत. त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सापशिडीचा गेम देखील देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा:
- Uttarkashi Tunnel rescue operation: आता मनोधैर्य राखण्यासाठी 'लढाई'! ४१ कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
- Uttarkashi Tunnel rescue operation: आता मनोधैर्य राखण्यासाठी 'लढाई'! ४१ कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
- Mumbai 26/11 : २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

