Uttarakhand tunnel rescue : आता ‘रोबोटिक’ प्रणालीद्वारे होणार बोगद्यात अडकलेल्‍या कामगारांना मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्‍य सचिव डॉ. पीके मिश्रा यांनी घटनास्‍थळी भेट देऊन तेथे अडकलेल्या कामगारांच्‍या नातेवाईकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्‍य सचिव डॉ. पीके मिश्रा यांनी घटनास्‍थळी भेट देऊन तेथे अडकलेल्या कामगारांच्‍या नातेवाईकांशी संवाद साधला.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तरकाशीत बांधकाम सुरु असणार्‍या बोगद्यात अडकलेले ४१ कामगारांना बाहेर काढण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आज (दि.२७) बचावकार्याचा १६ वा दिवस आहे. दरम्‍यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांची मानसिक स्थितीसह घातक वायूचा शाेध घेण्यासाठी रोबोटिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी आज ( दि.२७) दिली. (Uttarakhand tunnel rescue )

Uttarakhand tunnel rescue : कसे काम करेल रोबोटिक तंत्रज्ञान?

कामगारांना पुरविण्‍यात येणार्‍या रोबोटिक सिस्टीमच्‍या ( यंत्रणा) माध्‍यमातून बोगद्यातील मिथेनसारखे घातक वायूचा शोध घेण्‍यात येईल. त्‍याचबरोबर कामगारांना इंटरनेट सेवा देवून त्‍यांच्‍या आरोग्‍यावर लक्ष ठेवण्‍यात येईल. याच माध्‍यमातून आम्‍ही कामगारांची मानसिक स्‍थिती सकारात्‍मक करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार आहोत, असेही रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी सांगितले. यापूर्वी लखनौमध्‍ये इमारत दुर्घटनानंतर .िढगार्‍याखाली अडकलेल्‍या १४ जणांना जिवंत बाहेर काढण्‍यात आले होते. यावेळी बचावकार्यात अशाच प्रकारची रोबोटिक प्रणाली वापरल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

बोगद्यात अडकलेल्या ऑगर मशीनचे भाग कापून बाहेर काढण्यात आले आहेत. आता मॅन्युअल ड्रिलिंगचे (कामगारांच्‍या सहाय्‍याने खोदकाम) काम सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्‍य सचिव डॉ. पीके मिश्रा यांनी घटनास्‍थळी भेट देऊन तेथे अडकलेल्या कामगारांच्‍या नातेवाईकांशी संवाद साधला. तसेच कामगारांना पाठवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती घेतली.

Uttarakhand tunnel rescue : आम्ही प्रगती करत आहोत : अर्नोल्ड डिक्स

आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी सांगितले की, आम्ही प्रगती करत आहोत. आम्ही करत असलेल्या टीमचा मला खूप अभिमान वाटतो. मॅन्युअल ड्रिलिंग (मानवी मदतीने खाेदकाम) अद्याप सुरू झालेले नाही, ते सुरू होताच आम्ही कामगारांच्‍या सुटकेसाठीच्‍या अंतिम टप्‍प्‍यात वाटचाल करू.

माजी 'बीआरओ' प्रमुख लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग (निवृत्त) यांगी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत अडकलेले ऑगर मशीन काढून टाकण्यात आले आहे. खराब झालेल्या पाईपचा १.५ मीटर भाग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगारा हटवल्यानंतर, मजबुतीकरण केल्यानंतर, लष्कराच्या मदतीने कुशल मजूर आत जातील. आम्हाला आशा आहे की, हे लवकरच पूर्ण होईल. बोगद्याच्या वरती ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news