‘यूपीए’ काळात अर्थव्‍यवस्‍था झाली हाेती ठप्‍प : मोदी सरकारने सादर केली श्वेतपत्रिका

‘यूपीए’ काळात अर्थव्‍यवस्‍था झाली हाेती ठप्‍प : मोदी सरकारने सादर केली श्वेतपत्रिका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०१४ पूर्वीच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका सादर केली. काँग्रेस पक्षाच्‍या नेतृत्त्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडी ( यूपीए) सरकार आर्थिक व्‍यवस्‍थापनात पूर्णपणे अपयशी ठरले होते. यामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती, या सरकारने घेतलेल्या निर्णयांनी देशाला आणखी पिछाडीवर नेले, असे श्वेतपत्रिकेत नमूद केले आहे. ( UPA inherited healthy economy : Govt tables white paper in LS )

सरकारने २०१४ पूर्वीच्‍या भारतीय अर्थव्यवस्थेवरील श्वेतपत्रिकेत म्‍हटले आहे की, युपीए सरकार सत्तेत आल्‍यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या नेतृत्वाखालील राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) सरकारच्या सुधारणांच्या  परिणामांचा आणि अनुकूल जागतिक परिस्थितीचा फायदा घेतला गेला. दीर्घकालीन आर्थिक परिणामांची फारशी चिंता न करता संकुचित राजकीय हेतूंसाठी परिणामी वेगवान आर्थिक वाढीचा फायदा घेण्यास सुरुवात केली. परिणामी बुडीत कर्जाचा डोंगर उभा राहिला. उच्च वित्तीय तूट, उच्च चालू खात्यातील तूट आणि दोन अंकी चलनवाढ पाच वर्षे कायम राहिली. ज्याचा परिणाम अनेक भारतीयांच्या खिशावर पडला, असेही यामध्‍ये म्‍हटले आहे. (UPA inherited healthy economy : Govt tables white paper in LS )

यूपीएच्या काळातील राज्यकर्ते केवळ अर्थव्यवस्थेत गतिमानता आणण्यात अपयशी ठरलेच. त्‍याचबरोबर अर्थव्यवस्थेची एवढी लूटही केली की, देशातील उद्योगपती भारतात गुंतवणूक करण्याऐवजी परदेशात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले. गुंतवणूकदारांना पळवून लावणे सोपे आहे; परंतु त्यांना परत मिळवणे कठीण आहे. अर्थव्यवस्था वाढवण्यापेक्षा त्याचे नुकसान करणे सोपे आहे, हे यूपीए सरकारनेही दाखवून दिले, असेही सरकारने जाहीर केलेल्‍या श्वेतपत्रिकेत म्‍हटले आहे.

'एनडीए' ने सत्ता हाती घेतली तेव्हा अर्थव्यवस्था संकटात होती

2014 मध्ये जेव्हा 'एनडीए' सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा अर्थव्यवस्था केवळ वाईट अवस्थेतच नव्हती तर संकटात होती. एका दशकातील गैरव्यवस्थापनीय अर्थव्यवस्थेचे निराकरण करण्याचे आणि तिची मूलभूत तत्त्वे दृढपणे पुनर्संचयित करण्याचे जटिल आव्हान आमच्यासमोर आहे. आम्ही एक गोठलेल्‍या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक होतो; आता, आम्ही 'टॉप फाइव्ह' अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत, जे दरवर्षी जागतिक वाढीमध्ये तिसरे सर्वात मोठे योगदान देत आहे. युपीए सरकारच्‍या काळात जगाचा भारताच्या आर्थिक क्षमता आणि गतिमानतेवरचा विश्वास उडाला होता; आता, आमच्या आर्थिक स्थिरता आणि वाढीच्या संभाव्यतेमुळे, आम्ही इतरांमध्ये विश्‍वास निर्माण करण्‍यात यशस्‍वी ठरलो आहे, असेही या श्वेतपत्रिकेत म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news