

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकाने डायल 112 वर योगी आदित्यनाथ यांना मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यूपी एटीएससह सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २३ एप्रिल रोजीच्या रात्री ८:२२ वाजता यूपी-११२ मुख्यालयात सोशल मीडियाच्या व्हॉट्सॲप डेस्कवर धमकी देणारा मॅसेज मिळाला. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज देण्यात आला आहे. या धमकीच्या मॅसेजनंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
याआधीही धमकी मिळाली होती
याआधीही योगी आदित्यनाथ यांना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर लखनऊच्या सायबर सेलने राजस्थानच्या मेवाड येथून सरफराज नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्यानेही डायल ११२ च्या व्हॉट्सॲप वरून धमकीचा मॅसेज केला होता. या प्रकरणी लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये २ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा :