

पुढारी ऑनलाइन डेस्क : Terrorist Attack : पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यावर सोमवारी हल्ला करण्यात आला. हा हल्ला दहशतवाद्यांकडून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडललेल्यांमध्ये 8 जण पोलिस कर्मचारी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला स्वात जिल्ह्यातील कबाल काउंटर डिपार्टमेंट येथे झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या आता दोन विस्फोट झाले. ज्यामध्ये इमारती पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. Terrorist Attack
डीपीओ स्वात शफीउल्ला म्हणाले, हा दहशतवादी हल्ला Terrorist Attack आहे. स्फोटामुळे तीन इमारती कोसळल्या आहेत. तसेच स्फोटानंतर लगेचच आग देखील लागली.
पोलिस अधिकारी इमदाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलिस ठाणा परिसरात विस्फोट झाला. या परिसरात सीटीडी चे कार्यालय आणि एक मशीद आहे.
खैबर पख्तूनख्वाह चे पोलिस महानिरीक्षक अख्तर हयात खान यांनी म्हटले आहे की हल्ल्यानंतर संपूर्ण प्रांतात सुरक्षा अधिकाऱ्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. Terrorist Attack
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विस्फोटनंतर अनेक नागरिक मलब्याखाली दाबले गेले. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तसेच जवळपासच्या सर्वच रुग्णालयांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
Terrorist Attack : प्रधानमंत्री शरीफ यांनी केला घटनेचा निषेध
पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध करत निंदा केली आहे. तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना केली. तसेच स्वात प्रशानसनाकडून घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.
पाकिस्तानमध्ये मागील काही काळापासून अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले वाढले आहेत. आतंकवाद्यांनी यापूर्वी देखील पोलीस ठाण्यांवर हल्ले केले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अशाच प्रकराचा दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा :