

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट, पुढारी वृत्तसेवा; China Issue : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी चीन संबंधी दिलेल्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी चीन संबंधी काहीही कसे बोलू शकतात? असा सवाल केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी चीन सोबत एक सामंजस्य करार केला असून ते चिनी राजदूतासोबत भेटत असतात. चीन सोबत काय करायला हवं, हे आता ते आम्हाला शिकवतील का असा टोला चंद्रशेखर यांनी लगावला. राहुल गांधींचा पक्ष कॉंग्रेस सत्तेत असताना चीन सरकारला न दुखवण्यासाठी त्यांनी रस्ते बांधले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कुठलाही करार केलेला नाही. कुठल्याही देशाला आपल्या देशाच्या क्षेत्रीय अखंडतेचा एक इंच देखील उल्लंघन करू दिले नाही, असा दावा चंद्रशेखर यांनी केला. (China Issue)
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासात राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर मोदी सरकारनेच शून्य सहिष्णुता दाखवली आहे. आमच्या सरकारची सुरक्षेसंबंधी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका असल्याचे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :