पेठ; पुढारी वृत्तसेवा: सातगाव पठार भागात बटाटा पीक जोमात आले आहे. सध्या बटाटा पिकावर औषध फवारणी व रासायनिक खते टाकण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेठ, पारगाव, भावडी भागात बटाटा पीक फुलोर्यात आले आहे. बटाटा पिकाची वाढ होत असल्याने औषध फवारणी व खते टाकण्यात येत असल्याचे शेतकरी गोरक्षनाथ नवले पाटील यांनी सांगितले. या वर्षी बटाटा पिकाला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे. भावडी, थूगाव परिसरात बटाटा पिकाची वाढ उत्तम झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.