पुणे : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 26 फेब—ुवारी 2022 रोजी पीएसआय, एसटीआय आणि एसओ पदांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्याचा अंतिम निकाल 2 जूनला जाहीर करण्यात आला, परंतु या निकालात जाहीर झालेल्या कटऑफ गुणांपेक्षा जास्त गुण विद्यार्थ्यांना आहेत. तरीदेखील त्यांची नावे निवड यादीत नसल्याचा आरोप संबंधित स्पर्धा परीक्षार्थींनी केला आहे.
स्पर्धा परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार, निवड यादीत नाव न आल्यामुळे त्वरित आयोगाला ई-मेलद्वारे संपर्क साधला व मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केले. अर्जासोबत पुरावा म्हणून ओएमआर कार्बन कॉपी आणि हॉल तिकीट जोडले, परंतु पाच दिवस उलटून गेले तरी आयोगाने अर्जावर कुठलीच कार्यवाही केली नाही.
'आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की कोर्ट-कचेर्या कराव्यात असा प्रश्न आहे. आयोगाने लवकरात लवकर अर्जांची पडताळणी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे. अन्यथा न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याशिवाय
आमच्याकडे पर्याय नाही,' असे
विद्यार्थ्यांनी सांगितले.
आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला कटऑफ
53.75
एसओ
48.25
पीएसआय
46.50
एसटीआय
मला ईडब्ल्यूएस खेळाडू या प्रवर्गातून 35.50 गुण मिळाले असून एसटीआय कटऑफ 22, पीएसआय 25.50 लागला असूनदेखील माझे गुणवत्ता यादीमध्ये नाव नाही
– समर्थ लोंढे, स्पर्धा परीक्षार्थी.
मला खुल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातून 47.50 गुण मिळूनदेखील माझे एसटीआयच्या गुणवत्ता यादीत नाव नाही.
– ऋषी मारवाडकर, स्पर्धा परीक्षार्थी
मला खुल्या ईडब्ल्यूएस
प्रवर्गातून 48.76 गुण मिळूनदेखील माझे पीएसआय-एसटीआयच्या गुणवत्ता
यादीत नाव नाही.
– ऋषिकेश काळे, स्पर्धा परीक्षार्थी.