पुणे : वारी व्यसनमुक्तीची व्हावी : डॉ. भोई

पुणे : वारी व्यसनमुक्तीची व्हावी : डॉ. भोई
Published on
Updated on

पुणे : 'पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकर्‍यांची वारी ही विठ्ठलभेटीसोबतच व्यसनमुक्तीचीही वारी ठरावी आणि या दृष्टीने संत विचार प्रबोधिनीने स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे,' असे प्रतिपादन कान-नाक-घसा आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी केले.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांच्या संत विचार प्रबोधिनीच्या वतीने ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात लोणंद मुक्कामी वारकरीबांधवांसाठी 'गुटखा-तंबाखू-मिश्री आणि तोंडाचा कॅन्सर' या विषयावर डॉ. भोई यांचे व्याख्यान व स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले होते.

.या उपक्रमाचे सलग पंधरावे वर्ष होते. व्याख्यानानंतर वारकरीबांधवांच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम पार पडला. अनेक वारकर्‍यांनी पांडुरंगाची शपथ घेऊन आम्ही आता गुटखा, तंबाखू, मिस्री यापासून लांब राहू, असा निश्चय केला. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रामचंद्र देखणे यांनी वारकरी बांधवांमध्ये प्रबोधन होण्यासाठी हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news