पिंपरी : ‘पीएमआरडीए’च्या सुनावणीस 60 टक्के उपस्थिती

पिंपरी : ‘पीएमआरडीए’च्या सुनावणीस 60 टक्के उपस्थिती
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सुनावणीस 16 हजार 257 जण उपस्थित राहिले. हे उपस्थितीचे प्रमाण 60 टक्के दिसून येत आहे. 15 जूनपर्यंत 13 नागरी विकसन केंद्रामधील 164 गावांमधील 27616 नागरिकांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी 16257 नागरिक सुनावणीसाठी उपस्थित होते. सर्वसाधारणपणे 60 टक्के नागरिक सुनावणीकरिता उपस्थित राहत आहेत.

पुणे महानगर प्रदेशाची प्रारुप विकास योजना दि. 2 ऑगस्ट 2021 रोजीच्या सुचने अन्वये प्रसिध्द झाली असून, प्राप्त हरकती/सूचनांवर सुनावणी देणेसाठी महानगर नियोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे.

सदर प्रारुप विकास योजनेवर प्राप्त हरकती / सूचनांच्या अनुषंगाने दि. 14 मार्च 2022 पासून 18 शहरी विकसन केंद्र, 8 ग्रामीण विकसन केंद्र व उर्वरित ग्रामीण भागातील गावांसाठी (एकूण 814 गावे) सुनावणी घेण्याचे कामकाज प्रगतीपथावर असून दि. 15 जून 2022 पर्यंत खालीलप्रमाणे नमूद 13 नागरी विकसन केंद्रामधील 164 गावांमधील 27616 नागरिकांना सुनावणीकरिता बोलविण्यात आले होते. त्यापैकी 16257 नागरिक सुनावणीसाठी उपस्थित होते.

सर्वसाधारणपणे 60% नागरिक सुनावणीकरिता उपस्थित राहत आहेत. सदर सुनावणी ही प्राधिकरणामार्फत सुनियोजित व व्यवस्थितरित्या पार पाडण्यात येत आहे.असे पी एम आर डी ए चे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

विकसन केंद्राचे नाव एकूण अर्जांची संख्या सुनावणीकरिता उपस्थितांची संख्या टक्केवारी

  • रांजणगाव 1962 1265 64.48
  • वाघोली 4255 2450 57.58
  • यवत 327 172 52.60
  • केडगाव 531 264 49.72
  • शिक्रापूर 1961 1178 60.07
  • नसरापूर 1073 650 60.58
  • उरुळीकांचन 1155 543 47.01
  • लोणी काळभोर 4268 2358 55.25
  • खेड शिवापूर 910 586 64.40
  • खडकवासला 2040 1358 66.57
  • सासवड 1763 1055 59.84
  • पिरंगुट 2760 1797 65.11
  • हिंजवडी 4611 2581 55.97
  • एकूण 27616 16257 58.87

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news