नगर : जामखेड नगरपरिषदेकडून गणेश मंडळांची आर्थिक लूट

तहसिलदारांना निवेदन देताना पदाधिकारी
तहसिलदारांना निवेदन देताना पदाधिकारी

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी जामखेड नगरपरिषद अडवणूक करून विनाकारण व नियमबाह्य पध्दतीने एक हजार रुपये आकारणी करूनच ना-हरकत दाखला देत आहे. गणेश मंडळांची आर्थिक लूट थांबवावी, या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले की, नगरपरिषद हद्दीतील सर्व सन, उत्सव व यात्रा व्यवस्थित पार पाडणे व त्यांची सर्व व्यवस्था करणे ही जबाबदारी नगरपरिषदेची आहे. नगरपरिषदेने कुठल्याही प्रकारे कसलाही कर न आकारता या सर्व व्यवस्था करणे गरजेचे असते. या नियोजनासाठी शांतता समितीची बैठक वेळोवेळी झाली. परंतु, मुख्याधिकारी मनमानी कारभार करून काहीही आदेश काढून जनतेला वेठीस धरतात. यापूर्वी देखील या संदर्भात निवेदने, उपोषण करून देखील त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला त्रास सोसावा लागत आहे.

यापूर्वी कधीही ग्रामपंचायत, तसेच नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून गणेशोत्सवात कुठलीही आडवणूक अगर कुठलीही पावती किंवा कर आकारणी करण्यात आलेली नाही. मुख्याधिकार्‍यांच्या सांगण्यावरून यावर्षी गणेश मंडळांकडून कर आकारणी केली जात आहे. ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बैठकांना मुख्याधिकारी सतत गैरहजर

मुख्याधिकारी हे यात्रा-उत्सवासाठी आयोजित शासकीय शांतता समितीच्या बैठकीला वेळोवेळी जाणीवपूर्वक गैरहजर राहतात. मुख्याधिकार्‍यांच्या या गैरवर्तनाबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानने केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news